हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

Foto
400 लिटर हातभट्टी दारूचे रसायन जप्त
खुलताबाद, दि.21 (प्रतिनिधी)ः खुलताबाद पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांना गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी म्हैसमाळ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगेश्वरी परिसरातील सतकुंड येथे अचानक धाड टाकून अंदाजे 400 लिटर हातभट्टी दारूचे रसायन जप्त केले.
जप्त केलेल्या हातभट्टी दारूचे रसायनाची किंमत 20 हजार रुपये असुन हातभट्टीव्दारे दारू तयार करणारे दशरथ गिरजाराम माळी यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मेहेत्रे सोबत पो.ना. यतीन कुलकर्णी, पोकॉ. गणेश लिपणे, भवसिंग जारवाल, महिला पोलीस अश्विनी चव्हाण असे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना गुप्त बतमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार सतकुंड परिसर खुलताबाद येथे 400 लिटर 20,000 रुपये किमतीचे हातभट्टी दारूचे रसायन जप्त करून आरोपी नामे दशरथ गिरजाराम माळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.